धारुर तहसीलचे दोन कर्मचारी परतले रेडझोन मधून

चौकशीची मागणी

किल्लेधारूर दि.१८(वार्ताहर) येथील तहसील कार्यालयातील दोन कर्मचारी औरंगाबाद येथून विनापरवानगी कार्यालयात पोहोचले असल्याची माहिती मिळाली असून रेड झोन असलेल्या ठिकाणाहून आल्याने कर्मचाऱ्यांतही दहशत पसरली असुन याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनी केली आहे.

शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी आवश्यक त्या प्रमाणात कर्मचारी कार्यालयात उपस्थित आहेत. परंतू काही कर्मचारी कामानिमित्त विना परवानगी परजिल्ह्यात जात असल्याचे उघड होत आहे. असाच प्रकार धारुर तहसील कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घडला असुन सदरील कर्मचारी औरंगाबाद सारख्या रेड झोनमधून परतल्याची चर्चा आहे. याबाबतीत तहसीलदार वंदना शिडोळकर यांच्याकडे माहिती घेतली असता सदरील दोन्ही कर्मचारी रितसर परवानगी घेवून परतले असल्याची माहिती मिळाली. मात्र रेड झोन मधून परलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चौकशी करण्याची दोषीवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!