नूतन पोलीस अधिक्षक राजा रामस्वामी यांची धारुर भेट;

किल्लेधारूर दि.२५ (वार्ताहर) जिल्ह्यात नव्यानेच आलेले जिल्हा पोलीस अधिक्षक राजा रामस्वामी यांनी आज दि.२५ शुक्रवार रोजी धारूर पोलीस स्टेशनला भेट देऊन येथील कामकाज व परिसरातील पहाणी केली. पोलीस स्टेशन आवारात केलेल्या घनदाट वृक्षलागवड ची पहाणी केली. पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हे संदर्भात माहिती घेत सुचना केल्या.

धारूर पोलीस स्टेशनला शुक्रवारी जिल्ह्याचे नवे पोलीस अधिक्षक राजा रामस्वामी यांनी भेट दिली. येथील पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आलेले घनदाट वृक्षलागवड यांची पहाणी केली. यावेळी राजा यांनी कर्मचाऱ्यांना काही सुचना केल्या. कोविड-१९ काळात पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुक करत पुढील काळात दक्षता घेत कुटूंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी ठाणे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, स.पो.नि. कानीफनाथ पालवे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे, पोलिस उपनिरिक्षक भालेराव, पोलिस उपनिरिक्षक मोमीन व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!