बीड जिल्ह्यातील 6 तर राज्यातील 92 नगर परिषदेसाठी आचारसंहिता लागू; पहा संपूर्ण कार्यक्रम.

42 / 100

मुंबई, दि. 24 नोव्हेंबर – बीड जिल्ह्यातील 6 तर राज्यातील 92 नगर परिषदा व 4 नगर पंचायतसाठी आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाली आहे. 92 नगर परिषद व 4 नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (General elections) 18 अॉगस्ट 2022 रोजी मतदान तर 19 अॉगस्ट 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आज काढले आहेत.

राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशावरुन (State Election Commissioner) आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आदेश काढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानूसार ज्या विभागात किंवा जिल्ह्यात पावसामुळे निवडणूका प्रभावित होणार नाहीत त्या ठिकाणी व तुरळक पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अशा 17 जिल्ह्यातील 77 तालुक्यातील 92 नगर परिषदा (Municipal Councils) व 4 नगर पंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात येत आहेत. आजपासून या क्षेत्रात निवडणूकीची आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाली आहे.

असा असेल निवडणूकीचा कार्यक्रम
20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करतील.
22 जुलै ते 28 जुलै 2022 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. दि.23 व 24 जुलै सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे (Nomination) स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 29 जुलै 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे 4 अॉगस्ट पर्यंत. मतदान 18 अॉगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 19 अॉगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी (Counting of votes) सुरू होईल.

( Code of Conduct for 6 Municipal Councils in Beed District and 92 Municipal Councils in the State; See full program. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!