माजलगावात आ.प्रकाशदादा सोळंकेनी केले फिवर स्क्रिनिंग
कोरोनाशी दोन हात

माजलगाव दि.२८(प्रतिनिधी) माजलगाव मतदारसंघाचे आ. प्रकाशदादा सोळंके यांनी स्वतः शहरातील विविध भागात फिरुन जनतेची फिवर स्क्रिनिंग केली असून लोकांनी घरात राहून शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. मुंबई, पुण्यासह औरंगाबाद, अहमदनगर, सोलापुर , मालेगाव आदी शहर हॉटस्पॉट झालेली आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत असुन यातून बचाव करण्यासाठी सर्वस्तरावर स्क्रिनिंग तपासणी होणे अत्यंत गरजेचे आहे. मतदारसंघातील नागरिकांना याचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून आ. प्रकाशदादा सोळंके यांनी माजलगाव शहरात फिवर स्क्रिनिंग सुरु केली आहे. आ. सोळंके स्वतः विविध भागात एम.डि.ए. व स्वंयसेवक वैद्यकिय पथकासह फिरत आहेत. शहरातील जुना मोंढा, नवनाथ नगर, दुध डेअरी परिसर आदी भागात स्क्रिनिंग झाली आहे. यावेळी डॉ. साबळे, डॉ. परदेशी, डॉ. नितिन आकोलकर, डॉ.जाजू, आशोक डक, कमलाकर करे आदीची उपस्थिती होती.