माजलगाव मतदारसंघातील राज्य किंवा राज्याबाहेर अडकलेल्यासाठी

किल्लेधारूर दि.२(वार्ताहर) माजलगाव मतदारसंघातील राज्य किंवा राज्याबाहेर अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष ॲप बनवण्यात आले असुन आ. प्रकाशदादा सोळंके यांनी या माध्यमातून प्रयत्न सुरु केले आहेत.
गेल्या चाळीस दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये राज्यात व राज्या बाहेर अनेक लोक अडकलेली आहेत. सतत वाढत असलेले लॉकडाऊन पाहता शासनाच्या मदतीने माजलगाव, धारुर व वडवणी या मतदारसंघातील अशा स्वरुपात राज्यात व राज्या बाहेर अडकलेल्या नागरीकांना परत गावाकडे आणण्याचा प्रयत्न
आ. प्रकाशदादा सोळंके यांनी सुरु केला आहे. यासाठी एक अॉनलाईन ॲप तयार करण्यात आला असून यात केवळ माजलगाव, धारुर व वडवणी येथील नागरीकच वापर करु शकतात. अशा अडकलेल्या लोकांची माहिती ॲपद्वारे ऐकत्रीत करुन प्रशासनाच्या मदतीने संबंधित लोकांना घरापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सोशल मेडियाच्या माध्यमातून सदरील ॲपची लिंक सर्वत्र वायरल करण्यात आली आहे.