राज्यात बारावी निकालात मुलींची बाजी;

पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) संपूर्ण राज्यातला बारावीचा निकाल ९०.६६ टक्के एवढा लागला आहे. आज दुपारी या निकालाची घोषणा करण्यात आली. या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे दिसुन आले.
कोरोना उद्रेकामुळे यंदा प्रेस नोटद्वारे या निकालाची माहिती जाहीर करण्यात आली. यंदा ९३.८८ टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ८८.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींचा निकाल जास्त टक्क्यांनी लागण्याची परंपरा यंदाही कायम आहे.
मुलींचा निकाल ९३.८८ टक्के
यंदाच्या बारावीच्या परिक्षेला पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांमधून १४ लाख १३ हजार ६८७ विद्यार्थी-विद्यार्थीनी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १२ लाख ८१ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाची टक्केवारी ९०.६६ टक्के आहे.