जिल्ह्यात भडका; ५८ पॉझिटीव्ह, गेवराई आठ दिवसासाठी लॉकडाऊन

बीडः आज आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा अचानक भडका झाला आहे. आज सर्वाधिक ५८ पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. आजच्या अहवालात धारुर तालुक्यातील २१ अहवालांचा समावेश आहे. धारुरचे सर्व अहवाल निगेटिव्ह आली आहेत. दरम्यान गेवराई शहरातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी आठ दिवसाची संचारबंदी लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला आहे.
आज आलेल्या अहवालानुसार बीड शहरात ३० तर परळी तालुक्यातील १३, अंबाजोगाई शहरात ५ तर गेवराईमध्ये २ पॉझिटीव्ह आढळली आहेत. याशिवाय आष्टीत ७ तर पाटोदा येथे १ नवीन रुग्ण आढळून आली आहेत. यात तब्बल ४० जन पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित किंवा संपर्कातील तर १२ रुग्ण नवीन आहेत. आजच्या अहवालात ३३ पुरुष तर २५ महिला संक्रमित आहेत. जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रुग्णांचा आकड्यात मोठ्या प्रमाणात समुह संसर्ग आढळून येत असून आज आलेली पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या धडकी भरणारी आहे. गेवराई शहरातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी आठ दिवसाची संचारबंदी लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतला आहे.