विविध करमाफीची नगर परिषद व पंचायत समितीकडे मागणी

घरपट्टी, नळपट्टी, दुकान भाड्याचा समावेश

किल्लेधारूर दि.२०(वार्ताहर) आज दि.२० सोमवार रोजी किल्लेधारुर युथ क्लब या सामाजिक संस्थेच्या वतीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास हजारे व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना निवेदन देऊन किल्लेधारूर शहरांमधील सर्व भागातील नागरिकांची एप्रिल, मे, जून या तीन महिन्याची घरपट्टी व पाणीपट्टी व नगरपालिकेच्या मालकीच्या दुकानाचा किराया तसेच तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे घरपट्टी, नळपट्टी आदी कर माफ करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

आज कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावामुळे अख्खे जग हैराण झाले आहे. किल्ले धारूर शहरातील नागरिक व ग्रामीण भागातील जनताही संकटाचा सामना करत आहेत. त्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. दोन वेळचे पोट भरण्यासाठी सुद्धा त्यांचा जीव मेटाकुटीला येत आहे. रोजगार, उद्योग धंदे, दळणवळण पूर्णतः बंद असल्यामुळे जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वसामान्यांची परिस्थिती हालाखीची आहे. यासाठी किल्ले धारूर शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी तसेच नगरपालिकेच्या मालकीचे दुकानाचा किराया माफ करावे म्हणून नगर परिषदेला निवेदन देण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा या कारणा मुळे हैराण आहेत. ग्रामीण भागाची आर्थिक स्थिती पूर्णपणे विस्कटली आहे. त्यांचेही उद्योगधंदे, रोजगार , मजुरी पूर्णपणे बंद झालेले आहे. यासाठी धारूर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत हद्दीतील एप्रिल, मे, जून या तीन महिन्याची नळपट्टी आणि घरपट्टी माफ करण्यात यावी. यासाठी किल्ले धारूर युथ क्लब च्या वतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनातून त्यांनी सर्व धारुर तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील नळपट्टी घरपट्टी माफ करावी असं मागणी करण्यात आली. या वेळेस किल्लेधारुर क्लबचे सदस्य प्रातिनिधीक स्वरूपात उपस्थित होते. यामध्ये सुरेश शिनगारे, अविनाश चिद्रवार, सूर्यकांत जगताप, प्रा .नितीन शुक्ला, रवि गायसमुद्रे, नाथा ढगे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!