भाजीपाला व फळे विक्रीचा नवीन निर्णय रद्द करण्यात यावा :- अॅड. इरफान बागवान
छोट्या व्यवसायिकावर उपासमारीची वेळ

बीड दि.१८(प्रतिनिधी) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भाजीपाला व फळे खरेदीसाठी होणारी गर्दी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय दिनांक १२ एप्रिल रोजी घेतला. परंतु प्रथमदर्शनी हा निर्णय चांगला वाटत असताना मागील काही दिवसात या निर्णयाचे दुष्परिणाम समोर येत आहेत. या निर्णयामुळे छोट्या व्ययवसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून सदरील निर्णय रद्द करावा अशी मागणी हजरत टिपू सुलतान युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अॅड. इरफान बागवान यांनी केली आहे.
महाराष्ट्रात कुठे नाही तर फक्त बीड जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भाजीपाला व फळे खरेदीसाठी होणारी गर्दी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय दिनांक १२ एप्रिल रोजी घेतला. परंतु प्रथमदर्शनी हा निर्णय चांगला वाटत असताना मागील काही दिवसात या निर्णयाचे दुष्परिणाम समोर येत आहेत. याचा फायदा ना शेतकऱ्याला ना ग्राहकाला होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना सदरील माल विकण्याकरिता प्रथमता चारचाकी वाहनांची अट घालण्यात आलेली आहे. तसेच चार ते पाच शेतकऱ्यांना एकत्रित येऊन आपला माल विकण्यासाठी यावे लागत आहे. कृषी विभागाला पास देण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे सामान्य नागरिक चार दिवसात भाजीपाल्यामुळे वैतागून गेले आहेत. शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी गल्लीत आल्यानंतर सोशल डिस्टन्ससिंग चे नियम पायदळी तुडवत आसल्याचे दिसुन येत आहे. तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठी दिलेल्या भागाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. दिवसभर भाजीपाला विक्री केल्यानंतर घरी जाऊन त्यांना शेतातील कामे होत नाहीत. तसेच फक्त शेतकऱ्यांना परवाना दिला असल्यामुळे हातगाडी लावून आपले व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणारे बागवान समाज तसेच माळी समाज या समाजातील छोट्या व्यापाऱ्यांना या भयानक परिस्थितीत उपासमारीस सामोरे जावे लागत आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी या छोट्या व्यापाऱ्यांचा व शेतकऱ्यांचा व भाजीपाला व फ्रूट आडते यांचा सहानभूतीपूर्वक विचार करून आपला निर्णय मागे घेऊन तो रद्द करण्यात यावा व पूर्वीप्रमाणेच भाजीपाला व फळ विक्री चालू ठेवावी असे निवेदन टिपू सुलतान युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष अॅड इरफान बागवान यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना दिले आहे .