कोरोंना विशेष

शहरातील चार गल्ल्यात तपासणी

बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध

किल्लेधारूर दि.२९(वार्ताहर) शहरात एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून बाधित गल्लीसह शेजारच्या चार गल्ल्यात आरोग्य पथकामार्फत तापीची तपासणी पुर्ण करण्यात येत असून तज्ञ डॉक्टर्सकडून रुग्णाच्या संपर्काचा आवाका शोधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

शहरातील दुधियापुरा गल्लीत काल एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला. यानंतर आरोग्य प्रशासनाने तात्काळ हालचाली करत रात्रीपासूनच रुग्णाच्या संपर्काचा आवाका शोधण्यास सुरुवात केली होती. आज दुधियापुरा गल्लीस लागून असलेल्या इतर चार गल्ल्यात चार स्वतंत्र आरोग्य पथकाकडून तपासणी सुरु करण्यात आलि आहे. या चार गल्ल्यातील ४२१ घरा पैकी ३९९ घरात फिवर स्क्रिनिंग करण्यात आली आहे. तर काल रात्री पासुन सुरु असलेल्या संपर्कातील लोकांचा शोधही अंतिम टप्प्यात आला आहे. दुधियापुरासह कटघरपुरा, कैकाडवाडा, रंगारगल्ली भागातही फिवर स्क्रिनिंग करण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांच्या कडून मिळाली. कॉन्टॕक्ट ट्रेसिंगसाठी डॉ. सचिन शेकडे, डॉ. चेतन आदमाने, डॉ. मारुती लगड, डॉ. परवेज शेख, डॉ. अमोल दुबे, डॉ. संजय पुजदेकर या ग्रामिण रुग्णालयाच्या पथकासह नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी, बाबुभाई मिस्त्री, शेख एजाज, ॲड. सय्यद साजेद यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!