सावधान… बीड जिल्ह्यात नवीन सात कोरोनाग्रस्त

काळजी घ्या, आता बाहेरच्याचे स्वॕबच घ्या

बीड दि.१७(प्रतिनिधी); जिल्ह्यात आज पुन्हा सात रुग्णांची वाढ झाली असुन संख्या वाढून नऊ झाली आहे. आता पुणे व मुंबईहून आलेल्या व्यक्तींची थेट स्वॕब नमुने घेवून रुग्णांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली असून आरोग्य विभागासह सर्वसामान्य लोकांचीही जबाबदारी वाढली आहे.

आज रविवारी आलेल्या  सात  पॉजिटिव्ह आले रुग्णांत 66, 65, 43, 38, 36, 10, 6, अशी त्यांचे वय असून पाच पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे.
हे सर्व १३ मे रोजी मुंबईहून निघाले होते. १४ तारखेला आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण येथे नातेवाईकांकडे आले होते. हे सर्व पिंपळगाव खुडा ता.अहमदनगर येथील रहिवाशी आहेत. जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात मुंबई व पुण्याहून येणाऱ्याची संख्या वाढली असुन  या रुग्णांना घरात क्वारांटाईन करण्यापेक्षा शहरात उभारलेल्या विलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे थेट स्वॕब नमुने घेवून रुग्णांचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आता जिल्ह्यात एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली असून जनतेने काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!