सुरक्षा देणाऱ्या दुर्लक्षीत दोन नेपाळी गोरख्यांना मदत

किल्लेधारूर दि.५ (वार्ताहर) नेपाळ मधून येऊन ईमानदारीने राञी बाजारपेठेत व गल्ली बोळीत गस्त घालणारे नागरीकाचे व व्यवसायाचे रक्षण करणारे शहरातील दोन गोरख्यांना नगरसेवक व पत्रकारांनी मदत देवून माणूसकीचा आधार दिला.

लाॕकडाऊन मुळे दोन महिन्या पासून त्यांना कामाचा मोबदला न मिळाल्याने अडचणीत आलेले व दुर्लक्षीत राहिलेले नेपाळी गोरखा यांना आज मदत देण्यात आली. शहरातील जागृत नागरीक व पञकारांनी एकञ येऊन त्यांना ही मदत केली व या कठीण परिस्थीतीत या इमानदार गोरख्यास आधार देण्याचे काम केले. इमानयेतबारे कर्तव्य बजावणाऱ्या या दोन गोरख्यावर उपासमारीची वेळ आल्याचे सर्वप्रथम येथील सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गोविंद बास्टे यांनी लक्षात आणुन दिले. यावर नगरसेवक अर्जून गायकवाड यांनी या दोघांस जीवनावश्यक वस्तूंची तर नगरसेवक बाळासाहेब सोनटक्के व व्यापारी कृष्णा भावठाणकर यांनी पत्रकारांच्या आवाहनानंतर गहू, तांदूळ आदी अन्नधान्य देवून मदत केली. यावेळी पत्रकार अनिल महाजन, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितिन शिनगारे, पत्रकार अतुल शिनगारे, इश्वर खामकर, रामेश्वर खामकर यांनी सर्वस्वरुपाची मदत करण्याचा संकल्प केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!