घात-अपघात

बस खड्ड्यात पडून 13 ठार ; मृतानां राज्य सरकारकडून मदत जाहिर.

मुंबई दि.15 एप्रिल – मुंबई-पुणे महामार्गावर शिंगरोबा मंदिराजवळ बस खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात एकुण 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही बस पुण्याहून मुंबईकडे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा ही बस जुन्या महामार्गावरील शिंगरोबा घाटातून खाली उतरत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात घडली. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, बसमध्ये 40 ते 45 लोक होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

सर्व जखमींना पोलिस व स्थानिक लोकांच्या मदतीने खंदकातून दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. बचावकार्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी क्रेन पाचारण केले. बसमधील सर्व प्रवासी हे गोरेगाव परिसरातील एका संस्थेशी संबंधित आहेत, ते सर्व पुण्यातील एका कार्यक्रमात सहभागी होऊन गोरेगावकडे परतत होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत शासन जखमीची सर्व काळजी घेत असून मयतांना 5 लाखाची मदत जाहिर केली आहे.
( 13 killed when bus fell into pit; Help for the deceased from the state government announced. )

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!