लोखंडी सळई घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन 12 जणांचा मृत्यू; मृतात मजूरांचा समावेश.

मुंबई दि. 20 ऑगस्ट- लोखंडी सळई घेऊन जात असलेला ट्रक (truck) पलटी होऊन अपघात झाला असून या दुर्घटनेत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) तळेगाव येथे हा भीषण अपघात झाला आहे.

(12 killed as truck overturns; Involvement of laborers in the dead.)

प्राप्त माहितीनुसार, बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथून मजूर घेऊन समृद्धी हायवेच्या (Samruddhi Highway) कामावर हे मजूर (laborers) जात होते. त्याच दरम्यान तळेगाव येथे हा अपघात (Accident) झाला आहे. समृद्धी महामार्गावर काम करणारे बिहारी मजूर असल्याचं वृत्त समोर येत आहे. एकूण 15 मजूर होते आणि त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात इतरही काही मजूर जखमी झाले आहेत. या जखमी मजूरांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या वेगात सुरू आहे. हा संपूर्ण महामार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी वेगाने महामार्गाचे काम सुरू आहे त्याच दरम्यान तळेगाव येथे भीषण अपघात झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!