५ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडी जाहिर….. पहा कोणाच्या हाती गावगाडा

किल्लेधारूर दि.१६(वार्ताहर) तालुक्यातील नुकत्याच झालेल्या पाच ग्रामपंचायतच्या कारभारी निवडीचा कार्यक्रम आज दि.१६ फेब्रुवारी मंगळवार रोजी शांततेत पार पडला. या पाच ग्रामपंचायतचे सरपंच निवडीसाठी संबंधित ग्रामपंचायत (Gram Panchyat) कार्यालयात दुपारी दोन वाजता सर्वसाधारण सभा घेण्यात आल्या.

तालुक्यातील जागीर मोहा, रुईधारुर, कोथिंबीरवाडी, भोपा व कासारी या पाच ग्रामपंचायतचे कारभारी निवडण्यात आले. यासाठी दि.१६ फेब्रुवारी रोजी त्या त्या ग्रामपंचायतच्या (Gram Panchyat) कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. कासारीच्या सरपंच (Sarpanch) पदावर सुनंदा महादेव बडे तर उपसरपंच म्हणून त्यांचाच मुलगा सदाशिव महादेव बडे यांची वर्णी लागली. कासारीचे सरपंच (Sarpanch) पद हे नागरीकांचा इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव होते. रुईधारुरच्या सरपंच पदी गिरी भागवत नाना तर उपसरपंच पदी अर्चना बालासाहेब सोळंके यांची निवड झाली. भोपा येथील सरपंच पद नामाप्र सर्वसाधारण आरक्षित आहे.भोपा ग्राम पंचायत सरपंच पदी सौ सुरेखा अंकुश तिडके तर उपसरपंच पदी सौ.संगीता ईश्वर वाघचौरे यांची निवड झाली. कोथिंबीरवाडीचे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. कोथिंबीरवाडी ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.शामबाला युवराज वैराट तर उपसरपंच पदी विनोद ढोरे यांची निवड झाली. जागीर मोहा ग्रामपंचायत सरपंच म्हणून सौ कांदे आशाबाई संजय तर उपसरपंच म्हणून सिरसट संगिता विजय यांची निवड झाली. भोपा वगळता बहुतेक ग्रामपंचायतीचा कारभारी बिनविरोध निवडला गेला आहे.

जागीरमोहा ग्रामपंचायत साठी अध्यासी अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. पी. गिरी, रुईधारुर ग्रामपंचायत साठी कृषि अधिकारी आमोल डाके, कासारी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी अनिल चौरे, कोथिंबीरवाडी ग्रामपंचायत साठी सहा. निबंधक एस.पी. नेहरकर तर भोपा ग्रामपंचायतसाठी मंडळ कृषी अधिकारी मुसळे साहेबराव यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!