बीड जिल्ह्यात आज 234 रुग्ण; धारुरमध्ये 15… पहा तालुका निहाय आकडेवारी

बीड दि.18 मार्च- गेल्या दोन आठवड्यापासून दररोज वाढणारी कोरोना बाधितांची संख्या प्रशासनाची झोप उडवत आहे. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 1903 प्राप्त अहवाला पैकी तब्बल 234 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 1669 जण निगेटिव्ह आली आहेत. आज चौदाव्या दिवशी बीड तालुक्यात 91 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. बीड पाठोपाठ आज अंबाजोगाईत 33 रुग्ण आढळून आली आहेत. आज धारुरमध्ये तब्बल 15 कोरोना बाधित आढळली आहेत.
(234 patients in Beed district today; 15 in Dharur … see taluka wise statistics)
तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड- 91, अंबाजोगाई-33, आष्टी-17, धारुर-15, गेवराई- 4, केज-5, माजलगाव-20, परळी-25, पाटोदा-14, शिरुर-7, वडवणी-3
अशी आहे.
कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.18 गुरुवारी जाहिर केली आहे. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 234 वर पोहोचली आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या गेल्या दोन आठवड्यापासून झपाट्याने वाढली आहे. यामुळे काल विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी बीड येथे प्रशासकीय बैठक घेवून कोरोनास्थितिचा आढावा घेतला. यावेळी केंद्रेकर यांनी अनेक सुचना मांडत प्रशासनातील अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
दरम्यान, बुधवारी दिवसभरात 23 हजार 179 नवीन कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण महाराष्ट्रात आढळली आहेत. काल 9 हजार 138 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 84 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या राज्यात 1 लाख 52 हजार 760 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बाधितांची संख्या प्रशासनाची झोप उडवत आहे.