कोरोंना विशेष

मुख्य रस्त्यावर शुकशुकाट; गल्ली बोळात मात्र गजबज

किल्लेधारूर दि.२९(वार्ताहर) आज शहरात लावण्यात आलेल्या अनिश्चित काळासाठीच्या संचारबंदीत मुख्य रस्त्यावर सकाळी शुकशुकाट बघायला मिळाला असून गल्ली बोळात मात्र नेहमी सारखीच गजबज दिसुन आली. तर प्रशासनाकडून घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर रात्री अनिश्चित काळासाठी संचारबंदी लावण्यात आली. मध्य रात्री नंतर पोलिसांकडून शहरात याबाबतीत ध्वनीक्षेपकावरुन आवाहनही करण्यात आले. जवळपासच्या ग्रामीण भागातील फळभाजी विक्रेत्यांची सकाळी जमवाजमव होत असताना पोलिसांनी गर्दी होण्यापुर्वीच पांगवले. शहरातील बस स्थानक ते काशिनाथ चौक या मुख्य रस्त्यावर शुकशुकाट दिसुन आला. मात्र शहराच्या गल्ली बोळात तुरळक प्रमाणात गजबज दिसुन येत होती. प्रशासनाच्या वतीने जनतेस घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!