महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित; आरोग्य विभागाची माहिती…. राज्याची डोकेदुखी वाढली.

मुंबई दि.3 डिसेंबर – 29 देशात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडल्यानंतर भारतात कर्नाटकमध्ये (Karnataka) ओमिक्रॉनच्या दोन केसेस सापडली. यामुळे महाराष्ट्राची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आता महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे (Omicron) 28 संशयित असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य प्रशासनानं (Health Department) दिली आहे.
(28 Omicron suspects in Maharashtra; Health department information …. State headaches increased.)
महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे (Pune), ठाणे (Thane) ह्या सर्वात मोठ्या शहरांमध्ये ओमिक्रॉनचे 28 संशयित आहेत. ही तिन्ही शहरं गर्दीची असून संशयितांपैकी एकट्या मुंबईत 10 जण आहेत तर इतर 18 जण हे विविध शहरात आहेत. हे सर्व जण गेल्या महिन्याभरात परदेशातून महाराष्ट्रात (Maharashtra) आलेले आहेत. यातले 25 जण हे परदेशी प्रवास करुन आलेत तर 3 जण हे त्यांच्या संपर्कातले आहेत. ह्या सर्वांचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आलेत. ओमिक्रॉनची एस जिन चाचणीही करण्यात आलीय. त्याचा रिपोर्ट पुढच्या आठवड्यापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईत एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नसल्याचे महापालिकेच्या महापौरांनी जाहिर केले आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून परदेशातून मुंबईत (Mumbai) जवळपास अडीच हजारापेक्षा जास्त जण दाखल झाले आहेत. हे सर्व जण हाय रिस्क अशा 40 देशातून आले आहेत. त्या सर्वांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचा शोध सुरु आहे.
आतापर्यंत सापडलेल्या 861 जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. यापैकी 25 जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) सापडले आहेत. हे 25 जण ज्यांच्या संपर्कात आले त्यांची आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचीही चाचणी केली गेली. त्यापैकी 3 जण पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच परदेशी प्रवास केलेले 25 जण आणि संपर्कात आलेले पण प्रवास न केलेले 3 जण ओमिक्रॉन संशयित (Omicron Suspects) आहेत. हे सर्व संशयित मुंबई,ठाणे, पुण्यात आहेत.
मुंबईतला संशयितांचा आकडा गेल्या चोवीस तासात पाचने वाढला आहे. जे पाच नवे संशयित आहेत, त्यापैकी एक जण हा लंडनहून आलेला आहे तर इतर चार जण हे दक्षिण आफ्रिका (South Africa), पोर्तूगाल, मॉरीशस, जर्मनीहून आलेले आहेत. संशयित हे 69, 34, 45, 38 अशा वयाची आहेत. सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांना अॅडमिट करण्यात आले आहे. जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि ओमिक्रॉनचे संशयित आहेत त्यांना सौम्य लक्षणं आहेत आणि घरीच क्वारंटाईन करण्यात आलं आहे.