24 तासात धारुरचे 3 कोरोना बळी; पहा तालुक्याची आकडेवारी.

किल्लेधारूर दि. 19 अॉगस्ट – कोरोनाची दुसरी लाट अद्याप बीड (Beed) जिल्ह्यात काही प्रमाणात सुरुच आहे. धारुर तालुक्यातही तुरळक प्रमाणात कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळत असून गेल्या 24 तासात तालुक्यातील तीन कोरोना बाधितांना आपला जीव (Corona death) गमवावा लागला आहे.
(3 corona victims of Dharur in 24 hours; See taluka statistics.)
एकीकडे कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे शासनाने निर्बंधात शिथिलता दिली आहे. तर दुसरीकडे कोरोना मृत्यूची शृंखला सुरुच असल्याचे दिसत आहे. आरोग्य प्रशासन लोकांना कोविड (Covid-19) नियमांचे पालन करण्याच्या सुचना करत असताना लोकं याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला धारुर तालुक्यातील कोरोना बळींची शतकपुर्ती झाली होती. आज पुन्हा कोरोना बळींचा आकडा वाढला आहे. धारुर (Dharur) शहरातील 73 वर्षीय पुरुषासह आवरगाव येथील 57 वर्षीय पुरुष व भोगलवाडी येथील 45 वर्षीय पुरुष कोरोनावर उपचार सुरु असताना दगावले आहेत.
धारुर शहरात गणेश भोजनालयच्या माध्यमातून ओळख निर्माण करणारे सिताराम (बाबु) काशिराम शिंदे यांचे आज पहाटे अंबाजोगाई येथे उपचार सुरु असताना निधन झाले. तर भोगलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बाबुराव सुदे यांचे कोरोनावर उपचार सुरु असताना निधन झाले. कालच शहरातील प्रतिष्ठित कापड व्यापारी मधूकर भोसले यांचे निधन झाले होते. यामुळे 24 तासात धारुर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.