अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात 5 वर्षाच्या बालकाचा मृत्यू; धारुर तालुक्यातील घटना.

किल्लेधारूर दि.3 जानेवारी – धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथे एका 5 वर्षाच्या बालकावर अज्ञात वन्यपशूने हल्ला केल्याची घटना रविवारी (दि.2) घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा आज दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

(5 year old child killed in animal attack in Dharur taluka.)

याबाबत मिळालेल्यानूसार धारुर (Dharur) तालुक्यातील सोनिमोहा येथे गावाच्या उत्तरेस असलेल्या मिरास नावाच्या शेतजमीनीत खेळत असलेल्या सहा वर्षीय बालक यशराज दत्तात्रय दराडे याच्यावर अज्ञात वन्यपशूने हल्ला केला. या हल्ल्यात यशराजच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या.

वेळीच नातेवाईकांनी जखमी यशराजला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात (SRTR) उपचारासाठी दाखल केले. मात्र रविवारी रात्री उपचार सुरु असताना बालकाचा मृत्यू झाला. बालकाचे वडिल दत्तात्रय आश्रोबा दराडे यांचा शेळी व मेंढीपालनाचा व्यवसाय असल्याचे कळते.

सदर घटना रविवारी (दि.2) सांयकाळी 5 च्या सुमारास घडली. सदरील प्रकाराबाबत धारुर पोलिस (Police), वन विभाग (Forest Department) अथवा रुग्णालयात कसलीच माहिती उपलब्ध होवू शकली नाही. मात्र गावातील ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनूसार बालकावर अज्ञात प्राण्याने हल्ला केला.  बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!