’50 खोके एकदम ओके’ … सभागृहाबाहेर आमदार आपसात भिडले.

53 / 100

मुंबई दि.24 अॉगस्ट – ’50 खोके एकदम ओके’ ‘करून महाराष्ट्राशी गद्दारी सत्तेत आली शिंदेंची स्वारी’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायला सुरुवात केली. यातच आज थेट सभागृहाबाहेरील पायऱ्यावर सत्ताधारी व महाविकास आघाडीचे आमदार (MLA) आपसात भिडल्याचे दिसून आले.
( ’50 boxes are ok’ … MLAs clashed outside the hall. )

राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजीचा सपाटा लावला असल्याचे पहायला मिळाले. काल अधिवेशनामध्ये अनेक महत्वाच्या विधेयकांवर चर्चा झाली परंतु आज मात्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर वेगळंच चित्र पाहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये सभागृहाबाहेर तुफान राडा झाला. यावेळी सत्ताधारी व विरोधी आमदार आपापसात भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. जोरदार धक्काबुक्कीसह विरोधकांची सरकार विरोधातील घोषणा दिल्याचे पहायला मिळाले.

विरोधक आमदार पायऱ्यांवर निदर्शने करणार या आधी सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यांवर जाऊन घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर विरोधी आमदार आल्यावर त्यांनी देखील घोषणा द्यायला सुरुवात केली. अशात शाब्दिक बाचाबाचीला सुरुवात झाली आणि पायऱ्यांवरच आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे दिसून आले. यावेळी चक्क शिविगाळ झाल्याचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सांगितले. याप्रकाराबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती दिली.

कुणी अंगावर आले तर शिंगावर घेऊ – आ. भरत गोगावले
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदार भरत गोगावले यावेळी चांगलेच आक्रमक झाले होते. आ. गोगावले (Bharat Gogavale) यावेळी म्हणाले, दररोज विरोधक याठिकाणी आंदोलन करत होते तेव्हा आम्ही शांत होतो परंतु आज आम्ही त्यांच्या जागेवर आंदोलन केलं तर त्यांना का झोंबल तसेच आम्हांला आडवं आले तर आम्ही त्यांना आडवे जाऊ. आमच्या अंगावर कुणी आले तर शिंगावर घेऊ”. असा थेट दम बोलताना विरोधकांना आ. गोगावले यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!