कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअरला पहाटे भीषण आग

कोल्हापूर : दि.२८- कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे (सिपीआर CPR) रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला (Trauma care unit) भीषण आग लागली आहे. या आगीत दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत जिवितहानीची भीती व्यक्त केली जात होती. (Kolhapur CP Hospital Get fire)
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला (Trauma care unit) आज पहाटेच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सीपीआरच्या या विभागात कोरोनाच्या अतिगंभीर 15 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दिली.