बीड जिल्ह्यात वाढ कायम… पहा धारुर केजमध्ये किती, अंबाजोगाई, बीडमध्ये विस्फोट, पहा तालुकानिहाय आकडेवारी….

बीड दि.20 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2191 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 239 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 1952 जण निगेटिव्ह आहेत. आज पुन्हा सर्वच तालुक्यात रुग्ण आढळले असून आज बीड व अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या संख्येत बाधित आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-57, अंबाजोगाई-64, आष्टी-20, धारुर-7, गेवराई-12, केज-16, माजलगाव-8, परळी-33, पाटोदा-3, शिरुर-10, वडवणी-9 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत आज सलग सहाव्या दिवशी मोठी वाढ दिसून येत आहे. आज सर्वाधिक बाधित अंबाजोगाई तालुक्यात आढळून आले आहेत. काल जिल्ह्यात 205 तर आज 239 रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकट्या अंबाजोगाई तालुक्यात 64 तर बीड तालुक्यात 57 रुग्ण आहेत.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या बुधवारच्या नोंदीनूसार 34 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2845 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 712 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 9.00 टक्के झाला आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात 43 हजार 697 कोरोना रुग्ण सापडले तर 49 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईसह राज्यात ओमायक्रोनचे 214 रुग्ण सापडले आहेत.
कोरोना आणि ओमायक्रोनचा संसर्ग राज्यात नियंत्रणात असला तरी दिवसभरात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत साडेचार हजारांनी वाढ झाली आहे. मंगळवारी राज्यात 39 हजार 207 रुग्ण सापडले होते तर 53 जणांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, राज्यात ओमायक्रोनचे 214 रुग्ण सापडले असून पुण्यात 158, मुंबईत 31, पुणे ग्रामीण 10, कल्याण-डोंबिवली आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 4, परभणी 2 तर नाशिक, वसई-किरार, संभाजीनगर, जळगाव आणि इतर राज्यांतून आलेल्या प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 2074 रुग्ण सापडले असून 1091 जण ओमायक्रोनमुक्त झाले आहेत.