‘जिंदगानी’ चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरचं शो हाऊसफुल्ल; मानवी भावनांचं भावविश्व सांगणाऱ्या ‘जिंदगानी’ चित्रपटाला रसिकांची पसंती.

सामाजिक बांधिलकी आणि निसर्गावर आधारित असलेला ‘जिंदगानी’ हा चित्रपट नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरचं चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल झाले आहेत. लॉकडाऊन नंतर मराठी चित्रपटसृष्टी पूर्वपदावर येत असताना मराठी चित्रपटाला रसिकांनी सुखद धक्का दिला आहे.
( Show Housefull before the release of ‘Zindagani’; Fans love the movie ‘Zindagani’ which tells the story of human emotions. )
रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन पत्रकारांसाठी व चित्रपटसृष्टीतील मान्यवरांसाठी केले होते. या प्रसंगी चित्रपट अभिनेता रोहन पाटील (धुमस चित्रपट फेम तसेच बडे आहे भावाचा फेम) प्रसिद्ध दिग्दर्शक शिवाजी दोलताडे, संतोष कुमार (जागतिक दर्जाचे ज्योतिष) निर्माते गोवर्धन दोलताडे आणि चित्रपटातील कलाकार तसेच पत्रकार उपस्थित होते.
यावेळी बोलताना चित्रपट अभिनेता रोहन पाटील ( Rohan Patil ) यांनी चित्रपट पाहिला ते बोलले की खूप वर्षा नंतर असा वेगळा आणि खूप चांगला चित्रपट पाहायला भेटला आणि रोहन पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की हा चित्रपट अनेक रेकॉर्ड ब्रेक करेल त्याच बरोबर या चित्रपटात नवीन च पदार्पण केलेली अभिनेत्री वैष्णवी शिंदे हिने सुद्धा खूप चांगली भूमिका पार पाडली.
यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाचे पुरस्कार मिळवले असून क्राउन वूड या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा ‘सर्वोत्कृष्ट पर्यावरणविषयक चित्रपट’ म्हणून गौरव करण्यात आला आहे.
निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपट पाहिला ते म्हणाले की “या चित्रपटाची कथा ही एका गावाची आणि तिथल्या गावकऱ्यांची कथा असून त्यांच्या संघर्षाची आहे. यातून निसर्गाचं जे शोषण मानव कळत नकळत करतो त्याबद्दल भाष्य हा चित्रपट करतो.
मानवी भावनांचं भावविश्व सांगणाऱ्या ‘जिंदगानी’चे ( Zindagani ) दिग्दर्शन आणि लेखन विनायक साळवे यांनी केले आहे तर सुनीता शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यावेळी जिंदगानी चित्रपटाचे सह निर्माते महेश क्षिरसागर ह्यांनी सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले व चित्रपट पाहायला आवाहन केले.