आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ; पहा काय आहे प्रकार…

बीड दि.10 एप्रिल – बीड उस्मानाबाद व लातूर (Beed Latur Osmanabad) स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस (MLC Suresh Dhas) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाने चांगलाच दणका दिला आहे. आमदार धस यांच्यासह 38 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याने नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एका प्रकरणात चर्चेत आलेल्या  आमदार धसांच्या अडचणी वाढल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील मनोज चौधरी यांच्या पत्नी, माधुरी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आठ महिन्यांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर आष्टी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या आठ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात 395 कलम वाढवण्याच्या उच्च न्यायालयाच्या (High Court) आदेशामुळे आ. धसांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

माधुरी चौधरी यांच्या फिर्यादीवरून (Complaint) आमदार सुरेश धस यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने आपल्या घरांची संरक्षक भिंत पाडली आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले, अशी फिर्याद दिली होती. यावरून पोलिसांनी कलम 143 , 147 , 148 , 149 , 427 , 336 आणि 379 ही कलमे लावून गुन्हा नोंद केला होता. मात्र त्यांनतर फिर्यादी माधुरी चौधरी यांनी कलमात वाढ करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी दाद न दिल्यामुळे चौधरी यांनी औरंगाबाद खंडपीठात रिट दाखल केली होती. त्यांनतर कलमात वाढ करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

माधुरी चौधरी यांच्या रिट याचिकेमुळे (Writ petition) कलमात बदल होऊन, दरोडा 395, बेकायदा घरात घुसने 448, चुकीच्या पद्धतीने एखाद्याला रोखून भीती दाखवणे 453, यासह शांतता भंग करणे आणि इतर 341, 504, 506 ही कलमे लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. दरम्यान यामुळे आता भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

( MLC Suresh Dhas’s difficulty increases; See what’s the type …)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!