कोरोंना विशेष

युवक व्यापाऱ्याकडून पोलिस ठाण्यात सॅनिटायझर चेंबर

आरोग्य विभागालाही गरज

किल्लेधारूर दि.१६(वार्ताहर) शहरातील युवक व्यापाऱ्यानी येथील पोलिस ठाण्यात सॅनिटायझर चेंबर बनवून अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आनोखा उपक्रम आज दि.१६ गुरुवार रोजी राबवला.

जागतिक स्तरावर सध्या कोरोना वायरसमुळे सर्वच देशातील पोलिस व आरोग्य प्रशासन जीवाचे रान करत असल्याचे दिसत आहे. या अवघड आणि आणीबाणीच्या काळात अनेक जन आपापल्या परिने सर्वसामान्य जनतेसह पोलिस व आरोग्य प्रशासनातील कर्मचाऱ्यांसाठी विविध स्वरुपात उपक्रम राबवून मदत करत आहेत. असाच अनोखा उपक्रम धारुर पोलिसांना कोरोना वायरस पासुन संरक्षण मिळण्यासाठी राबवण्यात आला. किल्लेधारूर पोलीस स्टेशन येथे आज पोलीसांसाठी आरोग्यास आवश्यक असणारे सॅनिटायझर चेंबर युवा व्यापारी कल्पक चिद्रवार, केदार चिद्रवार, ज्ञानु डुबे, कृष्णा डुबे यांनी भेट म्हणून दिले. यावेळी धारूर नगरीचे नगर अध्यक्ष डॉ.स्वरूप सिंह हजारी, एपीआय सुरेखा धस, स.पो.उ. गोविंद बास्टेसह पोलिस कर्मचारी उपस्थीत होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत असुन अशा स्वरुपाचे सॕनिटाझर चेंबर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ग्रामीण रुग्णालयातही राबवण्याची अपेक्षा केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!