दुचाकींची समोरासमोर धडक; बीड व वडवणीचे दोघे ठार.

बीड दि.31 मे – बीड-परळी रस्त्यावरील जरुड फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. सदरील अपघात (Accident) आज मंगळवारी ( दि. 31 ) दुपारी घडली आहे.
सुभाष लक्ष्मण राठोड रा. वडवणी खोरी तांडा, नरेंद्र प्रभाकर जोशी रा. रामगड नगर बीड अशी मयताची नावे आहेत. नरेंद्र जोशी हे वडवणी (Wadwani) येथे महावितरण कार्यालयात ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. सकाळी ते दुचाकीवरून वडवणीकडे जात होते तर, सुभाष राठोड हे वडवणी येथून बीडकडे (Beed) येत होते. दरम्यान जरुड फाट्यावर दोघांच्या दुचाकींची समोरासमोर जोरात धडक झाली.
दुचाकींची धडक होताच दोघेही रस्त्यावर फेकले गेले व दोघांनाही जबर मार लागला. यातच दोघांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर एम.एच. 23 ए एम 8537 व एम. एच. 44 वाय 3527 या अपघातग्रस्त दुचाकी अस्तावस्त पडल्या होत्या. अपघात घडताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. यामुळे जवळजवळ अर्धातास बीड-परळी मार्गावर ट्राफीक जाम (Traffic jam) झाला होता.
( Two-wheeler head-on collision; Both killed at Beed and Wadwani. )