शैक्षणिक

दहावी व बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर.

मुंबई दि. 19 जून – दहावी आणि बारावीचा निकाल (Maharashtra state board results) नुकताच जाहीर झाल. यात ज्या विद्यार्थ्यांना अपयश आलं त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षांच्या (Supplementary Exams) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अशा विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा  ही जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्येच घेतली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 

कधी आहे पुरवणी परीक्षा 
बारावीच्या पुरवणी परीक्षा या 21 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहेत. तर दहावीमध्ये अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही 27 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी ट्विट करत दिली आहे. 

राज्य परीक्षा मंडळाच्या मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इ.10 वी आणि इ.12 वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्यासाठी जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे. पुरवणी परीक्षांच्या माध्यमातून श्रेणी/ गुणसुधार योजनेअंतर्गत आपली संपादणूक सुधारू इच्छिणाऱ्या किंवा उत्तीर्ण होऊ पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नव्या उमेदीने आणि मेहनतीने अभ्यास करावा आणि या संधीचे सोने करावे. असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

तोंडी परीक्षा आणि प्रॅक्टिकल्स तसेच इ.12 वीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जुलै ते 08 ऑगस्ट आणि इ. 10 वीच्या परीक्षा 26 जुलै ते 08 ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत. सविस्तर वेळापत्रकासाठी http://mahahsscboard.in वर संपर्क साधावा. या परीक्षांसाठी इ.10 वीच्या इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 20 जून पासून सुरू होईल, तर इ.12 वीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 जूनपासून सुरू होत आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी ट्विट करत दिली आहे.

( Important news for 10th and 12th failed students; Announce the dates of supplementary examinations. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!