देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक ; एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री.

4 / 100

मुंबई दि.30 जुन – दहा दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक (Masterstroke) दिसून आला. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले असून देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे. आज संध्याकाळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील असा अंदाज बांधला जात असताना फडणवीस यांनी खेळलेल्या राजकीय खेळीमुळे चर्चेस उधान आले आहे.

शिंदे व फडणवीस यांची पत्रकार परिषद
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. फडणवीस म्हणाले की, “या सर्व परिस्थितीमध्ये शिवसेना (Shiv Sena) आमदारांची कुचंबना होत होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पर्यायी सरकार देणं गरजेचं होतं. म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष या सर्वाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.”

एकनाथ शिंदे यांच्या सरकारला भाजप बाहेरून पाठिंबा देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज साडेसात वाजता फक्त एकट्याचा शपथविधी होणार आहे. यानंतर भाजपसह इतरांचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून ते स्वतः मात्र बाहेर राहणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्याला एक सक्षम सरकार देणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

( Masterstroke of Devendra Fadnavis; Eknath Shinde is the new Chief Minister of Maharashtra. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!