प्रेरणादायी … बीडच्या अविनाश साबळेची आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक.

50 / 100 SEO Score

मुंबई दि.16 जुलै – बीडच्या अविनाश साबळेची अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Athletics Championships) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील 27 वर्षीय अविनाश साबळे याने 3 हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये (Steeplechase) फायनल गाठली आहे. टोकियो ऑलिम्पिक ( Tokyo Olympics ) स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या अविनाशने 8 मिनिटं आणि 18.75 सेकंद वेळ घेत तिसरा क्रमांक पटकावत अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीमध्येही त्याने याच पद्धतीची सर्वोत्तम कामगिरी केल्यास तो पदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करू शकतो. अविनाश सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असल्याने पदकाची अपेक्षा उंचावल्या आहेत.

अविनाश साबळे (Avinash Sable) याने जून महिन्यात झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत (Diamond League Tournament) 8 मिनिट 12.48 सेकंद वेळ घेत स्वत:चाच रेकॉर्ड मोडला होता. यापूर्वी त्याने 8 मिनिटे 16 सेकंद अशी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली होती. अविनाशने तब्बल 4 सेकंद कमी वेळ घेत नवा रेकॉर्ड केला होता. यावेळी अविनाशने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेल्या खेळाडूला देखील मागे टाकले होते. अविनाशने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतही सर्वोत्तम कामगिरी केली होती. परंतू , त्यावेळी त्याला फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले होते.

( Inspirational … Beed’s Avinash Sable makes it to the finals of an international tournament. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!