घात-अपघात

धारुर घाटातील बस कार अपघातातील जखमीचे निधन.

50 / 100

किल्लेधारूर दि.17 सप्टेंबर – धारुर घाटातील बस कार अपघातातील जखमी वडवणीचे प्रतिष्ठीत नागरीक तथा श्री स्वामी समर्थ सेवेकरी शाहूराव प्रल्हादराव काजवे यांचे लातूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना आज शनिवार (दि.17) रोजी दुपारी निधन झाले.
( Injured person dies in Dharur Ghat bus car accident. )

आठ दिवसांपूर्वी धारूरच्या घाटामध्ये (Dharur Ghat) एस टी बस व स्विफ्ट डिझायर कार (bus car accident) यांच्यात भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये स्विफ्ट डिझायर कार मधील व वडवणीचे (Wadvani) रहिवासी शाहुराव प्रल्हादराव काजवे सह चालक गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर लातूर (Latur) येथील खाजगी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने आज शनिवारी दुपारी त्यांचे दुःखद निधन झाले. निधनाची वार्ता वडवणी शहरात कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली असून त्यांच्यावर रविवारी सकाळी वडवणी येते अंत्यसंस्कार होणार आहेत.

दि.11 रविवारी धारूर घाटात एस.टी.बस व वडवणीहुन येत असलेली स्विफ्ट डिझायर कार यांच्यात भीषण अपघात झाला होता. या अपघातात स्विफ्ट कारचा चक्का चुर झाला, स्विफ्ट डिझायर कार मध्ये चार व्यक्ती होते. त्यापैकी वडवणीचे शाहूराव प्रल्हादराव काजवे (वय 60 वर्ष) व कार चालक यांना गंभीर मार लागून गंभीर जखमी झाले. धारूर (Dharur) ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. शाहूराव काजवे यांची गंभीर परिस्थिती असल्याने त्यांच्यावर लातूर येथील सह्याद्री क्रिटिकल हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. मात्र आज शनिवारी दुपारी उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांचे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी वडवणीत अंत्यविधी होणार आहेत. शाहूराव काजवे यांच्या निधनाने श्री स्वामी समर्थ सेवेकरी आज पोरका झाला. तसेच वडवणीत ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली व सर्वांनी हळहळ व्यक्त केली त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!