बीड जिल्हाचे कोरोना मीटर सुसाट… पहा धारुर केजमध्ये किती, पहा तालुकानिहाय आकडेवारी….

बीड दि.21 जानेवारी – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2381 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी तब्बल 295 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 2086 जण निगेटिव्ह आहेत. आजही सर्वच तालुक्यात रुग्ण आढळले असून आज बीडमध्ये शंभरावर तर परळीतही मोठ्या संख्येत बाधित आढळले आहेत.
(Today’s Corona Update in Beed District; See what the status is.)
आजची तालुका निहाय आकडेवारी….
बीड-113, अंबाजोगाई-36, आष्टी-13, धारुर-11, गेवराई-9, केज-20, माजलगाव-18, परळी-59, पाटोदा-3, शिरुर-7, वडवणी-6 अशी आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्येत चालू आठवड्यात सलग मोठी वाढ दिसून येत आहे. आज सर्वाधिक बाधित बीड तालुक्यात आढळून आले आहेत. बुधवारी जिल्ह्यात 205, गुरुवारी 239 तर आज 295 रुग्ण आढळले आहेत. यापैकी एकट्या बीड तालुक्यात 113 तर परळी तालुक्यात 59 रुग्ण आहेत.
बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या गुरुवारच्या नोंदीनूसार 63 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण मृत्यू संख्या 2845 तर ॲक्टीव रुग्णांची संख्या 888 झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 10.91 टक्के झाला आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46 हजार 197 नव्या रुग्णांची भर झाली असून 37 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या 24 तासात 52, 025 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. बुधवारी राज्यात कोरोनाच्या 43 हजार 697 रुग्णांची नोंद झाली होती म्हणजे गुरुवारी अडीच हजार रुग्णांची वाढ झाली आहे.
दरम्यान राज्यात गुरुवारी 125 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 2199 ओमायक्रॉन बाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1144 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.