धारुर पोलिस हद्दीत धाडसी चोरी ; सोन्याच्या दागिन्यासह गॅस सिलिंडर लंपास.

किल्लेधारूर दि.26 सप्टेंबर – धारुर पोलिस हद्दीत आडस येथे धाडसी चोरी (Daredevil theft ) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेचे शासकीय निवासस्थानाचे पाठी मागील दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी तीन तोळे सोन्याचे दागिने (gold ornaments), गॅस सिलिंडर व रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्राथमिक आरोग्य केंद्र, आडस (ता. केज) येथे रंजना गणेश केकाण या परिचारिका (nurse) म्हणून कार्यरत आहेत. त्या प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील शासकिय निवासस्थानी रहातात. दसरा तोंडावर आल्याने घराची साफसफाई करण्याचे काम सर्वत्र सुरू आहे. रंजना केकाण याही शनिवारी (दि.24) सायंकाळी साफसफाई साठी केकाणवाडी येथे गेल्या होत्या. आज सोमवारी (दि.26) त्या परत आल्या असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यांनी घर उघडताच मागील दरवाजा तोडलेला दिसून आला. चोरी झाल्याची शंका आल्यामुळे दागिने ठेवलेली पिशवी पाहिली असता झुंबर, लाँग गंठण, पोत असं जवळपास 3 तोळे सोन्याचे दागिने, गॅस सिलिंडर (Gas cylinder) व रोख दिड हजार असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन झाल्यापासून या परिसरातील चोरीची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. चोरीची घटना उघडकीस येताच येथील इतर कर्मचाऱ्यांमध्ये मात्र भीती पसरली आहे. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी केकाण धारुर (Dharur) येथे गेल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच आडस चौकीचे जमादार प्रकाश सोळंके यांनी घटनास्थळी भेट दिली. धारुर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात येत असल्याचे कळते.
( Daredevil theft in Dharur police limits; Gas cylinder lampas with gold ornaments. )