12th results बारावीचा निकाल पाहण्याची सोपी पध्दत; कुठे आणि कसा पाहणार निकाल.

मुंबई दि.25 मे – 12th results बारावीचा निकाल पाहण्याची सोपी पध्दत शिक्षण मंडळाकडून जारी करण्यात आली आहे. आज दि.25 मे गुरुवारी दुपारी 2 वाजता बारावीचा निकाल जाहिर होत असून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board Result 2023) निकालांकडे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. ( Easy way to check 12th result; Where and how to see the result. )
कुठे आणि कसा पाहाल निकाल?
विद्यार्थी व पालकांना बारावीचा निकाल 12th results शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट https://www.mahahsscboard.in तसेच mahresult.nic.in आणि mahresults.org.in वर पाहता येणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर पुढे बारावी (HSC) हा पर्याय निवडावा. पुढे हॉलतिकीट क्रमांक आणि इतर माहितीचा तपशील भरल्या नंतर काही क्षणांत तुमचा निकाल तुमच्यासमोर दिसेल. राज्यभरातून विद्यार्थी व पालक या संकेतस्थळावर एकाच वेळी भेट देणार असल्यामुळे निकाल पाहताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तांत्रिक अडथळे उदभवल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन परीक्षा मंडळाकडून करण्यात आले आहे. याशिवाय एसएमएस (SMS) आणि डिजिलॉकरद्वारे (DigiLocker) देखील विद्यार्थ्यांना निकाल पाहाता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ…
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.mahahhscboard.in
ऑनलाईन निकाल कसा पाहाल? (HOW TO CHECK ONLINE RESULTS)
महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे.
निकाल पाहण्यासाठी शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेत स्थळ www.mahresult.nic.in ला भेट द्या.
होम पेजवर जा आणि महाराष्ट्र बोर्ड एसएससी निकाल 2023 / महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2023 लिंकवर क्लिक करा. तुमचा रोल नंबर, शाळेचा कोड आणि इतर माहिती भरा. अचूक माहिती भरल्यावर परीक्षेचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
कसा चेक कराल आपला निकाल? (How to check Maharashtra hsc results 2023 marksheets)
स्टेप 1 – महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे पोर्टल www.mahresult.nic.in वर लॉग ऑन करा.
स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3- तिथे असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका.
स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा.
स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
SMS द्वारे निकाल कसा पाहाल..? (HOW TO CHECK VIA SMS)
स्टेप 1. तुमच्या मोबाईल मधील SMS अॅपवर जा.
स्टेप 2. तुमचा रोल नंबर त्यानंतर MH (परीक्षेचे नाव) टाईप करा.
स्टेप 3. 57766 वर मेसेज सेंड करा.
स्टेप 4. तुमचा निकाल तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होईल.
डिजिलॉकरद्वारे कसा पाहाल निकाल? (HOW TO CHECK VIA DIGILOCKER)
स्टेप 1. DigiLocker अॅप उघडा किंवा digilocker.gov.in वर लॉग इन करा.
स्टेप 2. आवश्यक तपशील सबमिट करून नवीन नोंदणी करा. तुम्ही आधीच नोंदणी केली असल्यास तुमच्या खात्यात लॉग इन करा.
स्टेप 3. ‘MSBSHSE SSC निकाल 2023’ वर क्लिक करा.
स्टेप 4. महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल मिळविण्यासाठी तुमच्या आधार कार्डवरील माहिती अचूक लिहा.
स्टेप 5. यानंतर लगेच निकाल तुम्हाला प्राप्त होईल.