हवामान

Monsoon update मान्सून बाबत मोठी अपडेट… हवामान खात्याची माहिती.

54 / 100

मुंबई दि.26 मे – Monsoon update सध्या मे चा अंतिम आठवडा सुरु असून 1 जूनपर्यंत प्रतिवर्षी देशात मान्सून सर्वप्रथम केरळात दाखल होतो. यंदा मात्र मान्सून चार ते पाच दिवस विलंबाने पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ( Monsoon update… Big Update on Monsoon… Information from Meteorological Department. )

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे अनेक भागात पाऊस पडत आहे. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. आज मुंबईत सकाळी पाच वाजता अनेक भागांत पाऊस पडला. मुंबई उपनगरातील कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि बोरिवलीच्या काही भागात पाऊस पडला आहे. पावसाच्या हलक्या सरी पडल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असून, त्यामुळे आर्द्रताही वाढली आहे.

हवामान खात्याने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, पोर्ट ब्लेअरपासून जवळजवळ 425 किमी अंतरावर असलेल्या नानकोवरी बेटावर मान्सून अडकला आहे. त्यामुळे भारतात मान्सून चार ते पाच दिवसांच्या विलंबाने पोहोचू शकतो. केरळमध्ये साधारणपणे 1 जून रोजी दाखल होणारा मान्सून यंदा तो 5 जून दरम्यान दाखल होऊ शकतो. हवामान विभागाने मान्सूनचा चार आठवड्यांचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार देशात काही भागात 26 मे पासून मान्सूनची प्रगती दाखवली आहे. महाराष्ट्रात 9 जूनपासून मान्सून दाखल होणार असून 15 जूनपर्यंत सर्वत्र पसरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!