घात-अपघात

Accident भीषण अपघातात तीन ठार, एक गंभीर ; मित्राच्या लग्नाला जाताना बीड जवळ अपघात.

51 / 100

बीड दि.23 जून – accident मित्राच्या लग्नाला जाणाऱ्या तीन मित्रांवर काळाने घाला घातला असून आज दि.23 शुक्रवारी पहाटे बीड Beed तालुक्यातील पेंडगावजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात accident जागीच मृत्यू झालेले तीघे अहमदनगर Ahemadnagar जिल्ह्यातील नेवासा येथील रहिवासी आहेत. या अपघातात एकजण गंभीर जखमी आहे.

Accident… Three killed in a terrible accident, one serious; Accident near Beed while going to friend’s wedding.

अहमदनगर Ahemadnagar जिल्ह्यातील नेवासा येथून मित्राच्या लग्नासाठी बीडकडे Beed येत असताना पेंडगाव जवळ चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कारने  (कार क्रमांक MH- 17 BV 9673) तीन ते चार पलट्या घेत रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. अपघात accident ऐवढा भीषण होता की यात कारचा अक्षरशः चुराडा झाला. सदर अपघात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे दोनच्या दरम्यान झाला. अपघाताची माहिती कळताच महामार्ग वाहतूक पीएसआय घोडके, रवींद्र नागरगोजे, बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे लक्ष्मण जायभाये, पोलिस निरिक्षक रवी सानप घटनास्थळी पोहोचले. तसेच महामार्ग पेट्रोलिंग टीमचे प्रमुख प्रतीक कदम, सुनील कवडे, राम गायकवाड व महामार्ग रुग्णवाहिका डॉक्टर विशाल डोंगर, यशवंत शिंदे, ड्रायव्हर सुभाष नन्नवरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. मृतात धीरज गुणदेजा (वय 30), रोहन वाल्हेकर (वय 32), विवेक कांगुने (वय 33) यांचा समावेश आहे. तर आनंद वाघ (वय 28) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर बीड Beed जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!