Ajit Pawar अजितदादा पवारांच्या गाडीत बीड जिल्ह्यातून कोण ? राष्ट्रवादीचे 32 आमदार सहलीवर.

मुंबई दि.5 जुलै – Ajit Pawar राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या NCP फुटीनंतर आज मुंबईत दोन्ही गटाकडून बैठका घेण्यात आल्या. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बैठकीत 32 आमदारांनी उपस्थिती दर्शवली असून यात बीड जिल्ह्यातील आमदारांचा समावेश आहे. ( Ajit Pawar… Who is from Beed district in Ajit Pawar’s bus? 32 MLAs of NCP on trip.)
रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसला NCP फुटीचे ग्रहण लागून अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर इतर 8 जणांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर अजित पवार व शरद पवार Sharad Pawar असे दोन गट दिसून आले. दोन्ही गटाकडून पक्षावर दावा करण्यात आला असून आज दोन्ही गटांच्या स्वतंत्र बैठका मुंबईत घेण्यात आल्या. सकाळी मुंबई येथील एमईटी कॉलेजमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची तर यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार गटाची बैठक आयोजित करण्यात आली. अजितदादा पवार Ajit Pawar यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 32 आमदारांनी तर शरद पवार यांच्या बैठकीत 16 आमदारांची उपस्थिती होती. आज पहिल्यांदाच अजित पवार यांनी बैठकीत काका शरद पवार यांच्या अनेक निर्णयावर प्रश्न उपस्थित केल्याचे दिसून आले.
एमईटी कॉलेजमधील बैठकीस मोठ्या प्रमाणात आमदार व कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली. येथील सभागृहात कार्यकर्त्यांचे शपथपत्र घेण्यात येत होती. बैठक संपताच एका खाजगी बसमधून अजितदादा पवार Ajit Pawar, छगन भुजबळ यांच्यासह 32 आमदार अज्ञातस्थळी सहलीवर गेले. या बसमध्ये बीड जिल्ह्यातील आमदारात परळीचे आमदार तथा मंत्री धनंजय मुंडे, माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके, आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांचाही समावेश आहे. तर शरद पवार Sharad Pawar यांच्या बैठकीत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 पैकी 3 आमदार अजित पवार गटात असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, केजचे माजी आमदार पृथ्वीराज साठे व उषाताई दराडे यांनीही आपण शरद पवार यांच्या सोबत असल्याचे माध्यमातून सांगितले आहे.