राष्ट्रीय

Indian cricket team … बीडच्या सचिन धसची भारतीय क्रिकेट संघात निवड.

51 / 100

बीड दि.26 नोव्हेंबर – Indian cricket team… बीड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून दुबई येथे डिसेंबर महिन्यात होत 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात बीड जिल्ह्याचा सुपुत्र सचिन धस याची निवड झाली आहे. सचिन हा मुळ केज तालुक्यातील सांगवी (सारणी) येथील रहिवासी असून त्याच्या 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवडीनंतर सर्वत्र कौतूकाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून यशस्वी कामगिरी केलेल्या सचिन संजय धस याची 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात Indian cricket team निवड झाली. सचिन धस यांच्या आई सुरेखा धस यांनी धारुर Dharur पोलिस ठाण्यात कार्यरत असताना उत्कृष्ट कार्य केलेले आहे. त्या सध्या बीड Beed येथे कार्यरत आहेत. वडिल संजय धस आरोग्य खात्यात कार्यरत आहेत. सचिन धस याने महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करताना चॅलेंजर स्पर्धेत शतकी खेळी करत नेतृदिपक यश मिळवले होते. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश मिळाले. 7 डिसेंबर पासून होत असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. यानंतर लगेचच 19 वर्षाखालील संघाची वर्ल्डकप world cup स्पर्धा होणार आहे. सचिनची आक्रमक खेळी उद्याचा भारतीय संघाचा उगवता तारा ठरणारी आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात असून वर्ल्ड कपसाठी world cup शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!