जीवनदिप सेवाभावी संस्थेची अंध, अपंग, निराधारांना जीवनावश्यक वस्तुची मदत

किल्लेधारुर दि.१४(प्रतीनिधी) तालुक्यातील अंजनडोह येथील अंध, अंपग, निराधार, विधवा, क्वारंटाईन ऊसतोडणी कामगार कुटुंबाना जीवनदीप सेवाभावी संस्थेने दि.१४ गुरुवार रोजी जीवनावश्यक वस्तुची मदत केली.
संस्था तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण, कामगार या विषयात कार्य करते. कोरोना लाँकडाऊन निमीत्ताने अंजनडोह येथील दुर्धर रोगाने पिडीत, अंध, अपंग व निराधार यांना आर्थीक समस्या येत होत्या. त्यातच जीवनदीप संस्थेने केलेली जीवनावश्यक वस्तुची मदत महत्वाची व मोलाची ठरली आहे.
यावेळी नायब तहसीलदार श्री रामेश्वर स्वामी, राजाभाऊ हातागळे, ग्रामपंचायत पदाधीकारी प्रकाश सोळंके , सुधीर सोळंके , राजाभाऊ नेपते, आदर्श शिक्षक श्रीराम सिकची , प्रकाश काळे, संस्थेचे अध्यक्ष डाँ.बिभीषन पानढवळे उपस्थीत होते.