सांस्कृतिक

अत्याधुनिक तंत्राचा वापर करत टिपू सुल्तान जयंती अॉनलाईन साजरी

किल्लेधारूर येथे ऑनलाइन पध्दतीने टिपु सुल्तान जयंती साजरी;  मोहसिन खान यांचे लाईव्ह व्याख्यान

किल्लेधारूर दि.१२(प्रतिनिधि) धारूर शहरामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी टिपु सुल्तान जयंती निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम घेऊन जयंती साजरी झाली आहे. यावर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने यंदा जयंती ऑनलाइन पध्दतीने साजरी करण्यात आली. लातूर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता व चळवळीतील व्यक्तिमत्व मोहसीन खान यांनी टिपू सुलतान जयंतीनिमित्त झुम अॅपद्वारे अमूल्य मार्गदर्शन केले.

आपल्या मार्गदर्शनात मोहसिन खान यांनी हजरत टिपू सुलतान यांनी देशासाठी केलेले कर्तव्य, देशासाठी दिलेली प्राणाची आहुती या सर्व विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच आजच्या परिस्थितीत भारतामधील मुसलमानांची राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती विषयी सखोल विश्लेषण केले. त्यांनी यावेळी शासनाकडे  मुस्लिम समाज अत्यंत दुर्लक्षित, बिकट व व मागास परिस्थिती असून मुस्लिम समाजाला विशेष सवलती व आरक्षण देऊन सदर समाजाला पुढे आणण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे तरच देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली. सदर ऑनलाईन व्याख्यानात टिपू सुलतान जयंती उत्सव समितीचे आयोजक ॲड. सय्यद साजेद यांनी प्रास्ताविक केले तर धारूर येथील सामाजिक कार्यकर्ते सादिक ईनामदार यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. धारूर शहरात टिपु सुल्तान यांची जयंती निमित्त प्रतिवर्षी महाराष्ट्रातिल प्रसिद्ध वक्ते समाज सुधारक यांचे व्याख्यान, तसेच विविध समाज उपयोगी उपक्रमासह व इतर सामाजिक कार्यक्रम धेऊन जयंती साजरी केली जाते. परंतू या वर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने जयंती यंदा ऑनलाइन पध्दतीने साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचा बीड जिल्हा मराठवाडा व महाराष्ट्रातील अनेक भागांतून लोकांनी अॉनलाईन जॉईन होऊन लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!