एकतर्फी प्रेमातून मित्रानेच काढला मित्राचा काटा… तिघे पोलिसांच्या ताब्यात

ज्ञानेश्वर तिच्याशी फोनवर बोलतो, हे कळल्यावर प्रमोदच्या मनात राग निर्माण झाला. त्याने ज्ञानेश्वरला याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र……
हिंगोली दि.२५- वसमत तालुक्यातील कळवा पाटीजवळ नोव्हेंबर 23 सोमवार रोजी एका युवकाचा पोलिसांना मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी गतीने तपासाची चक्रे फिरवत सदरील युवकाचा खून एकतर्फी प्रेमातून मित्राने केल्याचा एक दिवसात उजेडात आणले. हट्टा पोलीस (Police) ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
खुनाचा तपास गतीने करत पोलिसांनी (Police) प्रमोद आप्पासाहेब खाडे, विनोद भीमराव कापुरे आणि प्रवीण लक्ष्मण अंभोरे या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांची कसून चौकशी केली. त्यावेळी प्रमोदने खून (Murder) केल्याचे कबूल केले. पोलीसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर हा एका तरुणीशी फोनवर सतत बोलायचा. त्याचा मित्र प्रमोद याचे त्या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. ज्ञानेश्वर तिच्याशी फोनवर बोलतो, हे कळल्यावर प्रमोदच्या मनात राग निर्माण झाला. त्याने ज्ञानेश्वरला याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे फोनवर बोलणे सुरूच होते. त्यामुळे प्रमोदचा राग अनावर होऊन त्याने ज्ञानेश्वरचा काटा काढायचे ठरवले.
त्याने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने ज्ञानेश्वरचा खून (Murder) केला. त्याच्या डोक्यात शस्त्राने वार करून त्याचा मृतदेह कळंबा पाटीजवळच्या शेतात फेकून दिला. संशय येऊ नये म्हणून त्याची दुचाकी एका पुलाखाली फेकून दिली.