शेती विषयक

पावसाचे कमबॕक… बीडसह मराठवाड्यातील या जिल्ह्यात अलर्ट.

औरंगाबाद दि.2 अॉक्टोंबर – तीन दिवस उघडीप दिल्यानंतर कालपासून मराठवाड्यात (Marathwada) पावसाने कमबॕक केले आहे. काल 01 ऑक्टोबर रोजी दुपारपासून पुन्हा एकदा ढगांचा ढोल घुमू लागल्याचे आवाज येऊ लागले अन् दुपारनंतर अनेक जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

(Comeback of rain … Alert in this district of Marathwada including Beed.)

औरंगाबाद शहरासह दौलताबाद, खुलताबाद (Khultabad), पैठण (Paithan), कन्नड (Kannad) भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) झाला आहे. तर बीड (Beed) जिल्ह्यातही केज, धारुर (Dharur) तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. दरम्यान पुढील तीन दिवस म्हणजे 04 ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यात पावसाचे वातावरण असेच राहिल, असा इशारा हवामान विभागानं (Meteorological Department) दिला आहे.

पुढचे तीन दिवस मराठवाड्यात अलर्ट..
काल 1 ऑक्टोबर या दिवशी हिंगोली, जालना, औरंगाद, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस खालील जिल्ह्यांसाठी अलर्ट (Alert) देण्यात आला आहे.

2 ऑक्टोबर- या दिवशी परभणी, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात ढगांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
3 ऑक्टोबर- या दिवशी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर
4 ऑक्टोबर – औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या (Marathwada Agricultural University) हवामान सल्ला पत्रकात वर्तवण्यात आली आहे.

06 ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस 
दरम्यान, हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास 06 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारताच्या काही भागांतून सुरु होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!