धारुरच्या तरुणाची फेसबुक मैत्रीतून आत्महत्या

किल्लेधारूर दि.९:- धारुर शहराजवळच्या कासारी फाटा येथील २५ वर्षीय तरुण दीपक सुभाष सांगळे याने शुक्रवारी रात्री शेतातील  बाभळीच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या (suicide) केली होती. सदरील आत्महत्या ही फेसबुक (facebook)  मैत्रीतून झालेल्या मानसिक त्रासातून केली असल्याचे समोर आले आहे.

दिपक याची फेसबुकवरुन एका महिलेशी मैत्री झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर महिलेने तरुणाला लग्नासाठी गळ घालत जमीन व ट्रक नावावर करण्यासाठी तगादा लावला. या जाचास वैतागून तरुणाने दि.४ शुक्रवारी धारुरजवळीत एका शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. शनिवारी (ता. पाच) ही घटना समोर आली. या प्रकरणी सोमवारी (ता. सात) संबंधित महिलेसह या तरुणाच्या मित्रावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा धारुर पोलिस (Dharur Police) ठाण्यात नोंद झाला आहे. दिपक सांगळे हा अविवाहित व कुटूंबातील एककुलता एक मुलगा  होता. स्वत:च्या मालकीचा ट्रक चालवून तो कुटुंबाला हातभार लावत असे. मयत दिपक याची बहीण शीतल दिगांबर घुगे (रा. चिंचपूर ता.धारुर) यांनी सोमवारी धारुर पोलिस (Dharur Police) ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मयत दिपक याची आरती या पुणे येथील विवाहित महिलेशी फेसबुवर (facebook)  सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आरतीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर माझ्याशी लग्न कर, शेती व ट्रक नावावर कर असे म्हणून तिने त्यास मानसिक त्रास दिला. तिच्या सततच्या त्रासास कंटाळून दिपकने आत्महत्येचे (suicide)  पाऊल उचलले. आरतीला मृत दीपकचा मोबाइल (mobile) क्रमांक उपलब्ध करुन दिल्याने त्याचा मित्र ज्ञानेश्वर उर्फ वाघ्या बाबासाहेब मुर्गीकर (रा. धारुर) यालाही गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले. या प्रकरणात आरोपी महिलेच्या पूर्ण नावाचा उल्लेख नाही. तिची ओळख पटविण्यासाठी मयत दीपक सांगळे व त्याचा मित्र ज्ञानेश्वर मुर्गीकर या दोघांचे मोबाइल (Mobile) ताब्यात घेतले आहेत. त्यावरुन आरोपी महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु असून पुढील तपास सुरु असल्याचे माहिती पोलिस उपनिरिक्षक (Police) प्रदीप डोलारे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!