एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या आजी व भावाची हत्या करत स्वतः केली आत्महत्या

दिवसा ढवळ्या ६५ वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि १० वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने खळबळ
नागपूर : दि.११- एकतर्फी प्रेमातून माथेफिरुने कथित प्रेयसीच्या वृद्ध आजी आणि १० वर्षांच्या भावाचा जीव घेतला. दिवसा ढवळ्या ६५ वर्षीय लक्ष्मीबाई धुर्वे आणि १० वर्षाच्या यश धुर्वेच्या हत्येने (Murder) नागपुरात (Nagpur) खळबळ उडाली. सदरील घटना हजारीपहाड परिसरातल्या कृष्णनगरमध्ये काल दुपारी घडली. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने काल रात्री मनकापुर परिसरात रेल्वे ट्रॅक (Railway) वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं.
नागपुरातील (Nagpur) गांधीबाग परिसरातला हा तरुण अनेक दिवसांपासून धुर्वे कुटुंबातील तरुण मुलीच्या मागे लागला होता. मेहनत करून कुटुंब चालवणाऱ्या धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला समजूत घातली. त्यानंतर तिने त्या तरुणासोबत सर्व संपर्क तोडले होते. तरीही तो तरुण सतत धुर्वे कुटुंब राहत असलेल्या कृष्णानगर भागात यायचा. त्यामुळे ना इलाजाने धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला नागपुरातच दुसऱ्या परिसरात राहणाऱ्या मामाच्या घरी पाठवले होते. काल दुपारी धुर्वे दाम्पत्य आपल्या कामावर गेल्यानंतर घरी लक्ष्मीबाई आणि चिमुकला यश हे दोघेच होते. त्याच वेळी तो तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने आपल्या हातातील धारधार शस्त्राने लक्ष्मीबाई आणि यशचा खून (Murder) केला. शेजाऱ्यांनी धुर्वे यांच्या घरातून आलेल्या आवाजानंतर तिथे जाऊन पाहिले असता दुहेरी हत्याकांडाची ही घटना उघडकीस आली. लगेच घटनेची माहिती धुर्वे दाम्पत्याने पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस (Police) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हत्या केल्यानंतर तरुण फरार झाला. काल दुपारी दोघांची हत्या (Murder) केल्यानंतर आरोपी मानकापूर परिसरात गेला. तिथे रात्री ९ वाजून २६ मिनिटांनी जाणाऱ्या केरळ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली. केरळ एक्स्प्रेसच्या ड्रायवरने दिलेल्या माहितीवरुन रेल्वे (Railway) कंट्रोल रूम ने पोलीस (Police) नियंत्रण कक्षाला माहिती दिली, त्यांनतर पोलिसांनी (Police) घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीने आत्महत्या (suicide) केल्याची स्पष्ट झाले.