आता या प्रकरणातही मध्यस्थी करणार पवार साहेब….

मुंबई: दि.२१- सत्ताधारी आणि विरोधक यांच्या वादात मेट्रो कारशेडचा (Metro Car Shed) प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या प्रकरणी केंद्रानेही न्यायालयाचे दार ठोठावले आहे. परिणामी या प्रकरणाची गुंता दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मध्यस्थी करणार असल्याची माहिती अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे.

कांजूर मार्ग मेट्रो कारशेडच्या (Metro Car Shed) मुद्द्यावरुन सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात या विषयावर चर्चा झाली आहे. पवार यांनी याबाबत बोलताना याबद्दल कुठे तरी एकोपा निर्माण करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेही (Udhav Thakre) जर वाद सोडून यावर मार्ग निघाला तर बघायला हवा अशा भुमिकेत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर एकदोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील ते चर्चा करतील. मुंबईच्या विकासात अडथळा नको यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) देखील प्रयत्न करत असून यात पवार मध्यस्थी करत असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे. आधीपासून आमची भूमिका सामंजस्याची आहे. पण काही लोक यात राजकारण करत आहेत. म्हणून पवार साहेब यात मध्यस्थी करत असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!