रजनीताई पाटील होणार खासदार; राज्यसभेसाठी नामांकन.

बीड दि.20 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्ह्यातील माजी खा.रजनीताई पाटील (Rajani Patil) यांना राज्यसभेवर पुन्हा संधी देण्यात आली असून बीड जिल्ह्यात रजनीताईच्या रुपाने आणखी एक खासदार मिळणार आहे. यामुळे पाटील समर्थक कार्यकर्त्यांत आनंद व्यक्त होत आहे.
(Rajnitai Patil to be MP; Nomination for Rajya Sabha.)
बीडच्या माजी खासदार रजनीताई पाटील यांची दिवंगत खा. राजीव सातव यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर निवड निश्चित झाली आहे. पाटील यांची ओळख गांधी कुटूंबाच्या जवळच्या व सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या निकटवर्तीय म्हणून आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.
गांधी कुटूंबियांशी एकनिष्ठ असलेल्या माजी खा. रजनीताई यांनी यापुर्वीही लोकसभेसह राज्यसभेवर काम केलेले आहे. पाटील यांनी केंद्रीय समाजकल्याण मंडळाचे अध्यक्ष पद भुषवलेले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या (Indian National Congress) जम्मु कश्मिरच्या प्रभारी म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे.
माजी खा. पाटील यांचा काँग्रेस हायकमांडकडे चांगले वजन असून त्यांच्या कामाची दखल पक्षश्रेष्टीं सातत्याने घेत आहेत. मागील काळात राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदासाठीही त्यांच्या नावाची चर्चा होती. पाटील या दिल्लीत (Delhi) दाखल झाल्या असून राज्यसभेच्या जागेसाठी नामनिर्देशनपत्र (Nomination) भरणार आहेत.
माजी. खा. रजनीताई पाटील यांच्या रुपाने बीड जिल्ह्याला पुन्हा एक खासदार मिळणार आहे. यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगलेच बळ मिळणार असून पाटील यांच्यामुळे बीड जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे.