चिंता वाढवणारी बातमी….लंडनहून परतलेल्या प्रवाशात आढळले रुग्ण

नवी दिल्ली: दि.२२- भारतासाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली असून लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात ५ प्रवासी हे कोरोना (Corona) पॉझिटीव्ह (Positive) आढळले आहेत. मार्चमध्ये सर्वप्रथम ३ रुग्ण आढळल्यानंतर देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. आठ महिन्यानंतर विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत होत असताना नवीन संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा नाईट कर्फ्यू (Night Curfew) लागलेला असतानाच, सदरील बातमी चिंता वाढवणारी आहे. लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात ५ प्रवासी हे कोरोना पॉझिटीव्ह (Positive) आढळले आहेत. सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. एकूण २६६ प्रवाशी या विमानात होते. विशेष म्हणजे इंग्लंडमध्येच (UK) कोरोनाचा (Strain) घातक विषाणू सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी भारताची (India) चिंता वाढवणारी आहे. भारत (India) सरकारने ब्रिटनमधून येणारी विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद केल्या आहेत. काल रात्री १२ वाजल्यापासून ही सेवा बंद करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये (UK) कोरोना (Strain) व्हायरसची नवी प्रजाती आढळून आल्याने जगातील सर्व देशांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.