भिंतीवर रक्ताने ‘सॉरी’ लिहून तिने केली आत्महत्या

कन्नड: दि.३० (प्रतिनिधी) शहरातील रामकृष्ण महल हॉटेलच्या रुममध्ये भिंतीवर रक्ताने ‘सॉरी’ (Sorry) लिहून पंख्याला गळफास घेऊन एका २२ वर्षीय युवतीने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी रात्री उशीरा एका आरोपीविरुध्द लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक व मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिध्दार्थ कॉलनीतील अंजली अविनाश केदार (२२) या युवतीने बसस्टँड परिसरातील रामकृष्ण महल हॉटेल मधील रुम नंबर १०९ मध्ये छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्या करण्यापूर्वी युवतीने उजव्या हातावर ब्लेडने वार केलेले व भिंतीवर रक्ताने सॉरी (Sorry) लिहीलेले आढळून आले. हॉटेलमध्ये आत्महत्या झाल्याचे हॉटेलचे मॅनेजर प्रकाश सोनवणे यांनी शहर पोलिस (Police) ठाण्यात माहिती दिली. या प्रकरणी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली नंतर रात्री उशिरा मयत युवतीची काकू ज्योती केदार (रा. शेंद्राबन औरंगाबाद) यांनी अंधानेर येथील बिअर बार मालक राम वाघुळे याने मयत अंजलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याचबरोबर तिला आत्महत्येस प्रवृत्त केले अशी फिर्याद दिली. याप्रकरणी आरोपी राम वाघुळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस (Police) उपनिरीक्षक सर्जेराव जाधव करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!