राज्यात नवीन कोरोना बाधितांचा विक्रमी आकडा; कोरोनाचा नवा व्हेरिएंट धोकादायक

मुंबई दि.25 मार्च – बुधवारी महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक ३१ हजार ८५५ नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात केवळ मुंबईत ५ हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची झाली. देशातील 18 राज्यात कोरोना व्हायरसचे डबल म्यूटंट व्हेरिएंट (Double Mutant Variant) आढळले आहेत. तो अतिशय धोकादायक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल स्पष्ट केले.
(Record number of new corona infestations in the state; The new variant of the Corona is dangerous)
सोमवारी महाराष्ट्रात (Maharashtra) २४ हजार ६४५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर मंगळवारी राज्यात २८ हजार ६९९ नव्या कोरोना बाधितांची (Corona Positive) नोंद करण्यात आली होती. यात वाढ होत बुधवारी राज्यात ३१ हजार ८५५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९५ रुग्णांच्य़ा मृत्यूची नोंद झाली. बुधवारी १५ हजार ०९८ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
राज्यात आतापर्यंत २५ लाख ६४ हजार ८८१ लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी २२ लाख ६२ हजार ५९३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे ५३ हजार ६८४ रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यात एकूण २ लाख ४७ हजार २९९ अॅक्टिव्ह केसेस (Active patients) आहेत. सर्वाधिक ॲक्टिव्ह केसेस (Active patients) पुण्यात आहेत.
कोरोना व्हायरस (Covid-19 Pandemic) महामारीचे संकट पुन्हा देशात वाढत चालले आहे. देशातील 18 राज्यात कोरोना व्हायरसचे डबल म्यूटंट व्हेरिएंट (Double Mutant Variant) आढळले आहेत. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. यासोबतच दोन नव्या स्ट्रेनचा समावेश आहे. याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा नवा व्हेरिएंट जुन्यापेक्षा कितीतरी पटीने धोकादायक आहे.