बीड जिल्ह्याचा आकडा सव्वातीनशे पार; अंबाजोगाई, बीड पाठोपाठ परळीतही मोठी वाढ;

बीड दि.25 मार्च- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्ण संख्या आज पुन्हा तीनशेपार झाली आहे. काल 299 असलेली संख्या आज 335 झाली आहे. आज बीड (Beed) जिल्ह्यातील 2276 प्राप्त अहवाला पैकी 335 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला असून 1941 जण निगेटिव्ह आली आहेत. आज विसाव्या दिवशी बीड तालुक्यात 106 कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत.

(The number of Beed district is over three hundred; Ambajogai, Beed followed by Parli also saw a big increase;)

अंबाजोगाईसह आता परळी व गेवराईत संख्या वाढली आहे. आष्टीचीही संख्या आज वाढलेली दिसली. आष्टीत 25 रुग्ण आढळली आहेत. काल अंबाजोगाईची संख्या 80 वरुन 90 झाली आहे.
(Re-growth in Beed district; Cage, Ambajogai, Beed’s anxiety increased;)

तालुका निहाय पॉझिटीव्ह (Positive) रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
बीड-106, अंबाजोगाई-90, आष्टी-25, धारुर-5, गेवराई-23, केज-16, माजलगाव-19, परळी-31, पाटोदा-11, शिरुर-4, वडवणी-5
अशी आहे.

कोविड-19 (covid-19) ची आकडेवारी बीड (Beed) जिल्हा प्रशासनाने आज दि.25 गुरुवारी जाहिर केली. बीड जिल्ह्यात आजची रुग्ण संख्या 299 वरुन 335 वर आली आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला आहे.

दरम्यान, बुधवारी राज्यात दिवसभरात 31 हजारावर नवीन कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्ण महाराष्ट्रात आढळली आहेत. महाराष्ट्रात वाढणाऱ्या प्रादुर्भावावर काल निर्बंध व लॉकडाऊन बाबत मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. यात लॉकडाऊन ऐवजी कठोर निर्बंध लावण्यावर एकमत झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!